गोष्ट आहे एका मित्रमंडळाची. स्वतःच्याच धुंदीत जगणार्या काही मित्र-मैत्रिणींची. एके दिवशी भल्या सकाळी त्यांना मिळाल्या फुलांनी भरलेल्या टोपल्या. कुणी दिल्या काय माहीत ? प्रत्येकाला ओंजळ भरून फुलं, ज्याच्या त्याच्या स्वभावासारखी. कुणाला अबोली, कुणाला लिली, कुणाला पावडरपफ, कुणाला चक्क एक सुंदर कमळ, कुणाला अनंत, कुणाला निशिगंध तर कुणाला वाटेवरची रानफुलं असं प्रत्येकाला काही ना काही. सगळे विचार करत होते आज काय विशेष ? तसं काहीच नव्हत विशेष त्या दिवसात पण तरी तो दिवस सुगंधी झाला. आज त्या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना ओंजळ भरून शुभेच्छा.