Friday, February 27, 2009

Natural colours for holi

Last year it was first holi of my son. I wanted him to enjoy it but was very scared about ill-effects store-bought colors. I googled, and found formulas for making some natural colors. It worked. So I thought I will share this information with you.
I made 3 colors, one using Beetroot, second using Besan (Chickpea flour) & Haldi (Turmeric) and third using Palak (Spinach).
Holi is already here so this year, plan to play a nature-friendly holi!
Make some colors and have fun!


Read more about how to make natural colors of holi here:
http://www.holifestival.org/holi-natural-colors.html
http://hinduism.about.com/od/holifestivalofcolors/a/naturalholi_2.htm
If you want to buy readymade natural holi colors visit:
http://www.e-coexist.com/
Holi also calls for Puran-Poli. This is my last year’s Holi Menu: Puran Poli, Katachi Amti, Kairee Bhat, Fresh Pickle of Kairee and Milk.
I wish you all a happy & natural holi !

Monday, February 23, 2009

शेवची भाजी / Shev Curry ?

In one of my recent trips to Amalner: a town in Jalgaon district, I tasted this signature dish of the region "Shevchi Bhaji". It is amazingly hot curry, generally served with Bhakri. They also serve Nagali (or Nachani) Papads in hotels there, which we hardly see in Pune. These tasty papads are light and crispy and very rich in calcium. The restaurant where we ate was a modest eatery near station. They had another interesting preparation called "Papdachi Bhurji". I tried to guess the recipe and re-created it at home. I will post its recipe soon. I do not have authentic recipe of Shevachi Bhaji. But here is a photograph for you.





Wood-Apple Chutney

Today is Mahashivratri. Though I am not a very religious person, I do prepare some fasting delicacies on such special fasting days. I know, many non-Indians get surprised to see the variety of food we eat when we are “fasting”. In India, at least in Maharashtra, meaning of fasting has changed (for bad) over the years. Now ‘fasting’ means eating a different set of food. This food is generally more greasy and unhealthy. In Marathi we have a saying that goes like, “Ekadashi Ani Duppat Khashi” meaning on the day of ekadashi, when you are expected to fast you eat double.

So today we all fast for fun and not as a religious practice.

Having said that, I must accept there are some really exquisite food items that we make only on special occasions like this one. We get plenty of Kavathas in market in this season and we prepare simple chutney with them.

Wood-Apple Chutney
1 KavaTha / Wood Apple*
4 Table spoons Jaggery
A generous pinch of Salt
½ Table spoon of Red Chilly powder
Slightly crushed Jeera


Break shell of Wood apple. This is how it looks like after breaking the shell :



Take out all soft, eadible part. Mash is with hands. Mix all other ingredients. Chutney is ready.

This is how ready chutney looks like:


A funny thing I noticed about English names of fruits, whenever they come across a new / unknown fruit they call it so and so apple. For example, custard apple for Sitaphal, Pine apple for Anannas, Wood Apple for Kavath!

Friday, February 20, 2009

हा स्थित्यंतरांचा आणि संक्रमणांचा काळ आहे .....



कॉलेजमधे असताना आम्हाला आमचे एक सर नेहमी असं सांगत, हा स्थित्यंतरांचा आणि संक्रमणांचा काळ आहे. आज कॉलेज सोडून बरीच वर्ष झाली तरी हे वाक्य माझ्या आयुष्याला जसं च्या तसं लागू होतं. आश्र्चर्य वाटत कायम 'तटस्थ' असणार्‍या सरांना आमच्या स्थितीचं हे असं नेमकं वर्णन करणं कसं जमायचं?
कॉलेजमधे रोजचा दिवस घडमोडींचा असायचा. तेव्हा घडणारी, न घडणारी प्रत्येक गोष्टच घटना वाटायची. एखाद्या नुसत्या कल्पनेने मन वेडावून जायचे. न बघता, न स्पर्शताही कित्येक गोष्टी खर्‍या वाटायच्या. तेव्हाचं सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण होतं.
या सगळ्या पळत्या जगात सर वेगळे ऊठून दिसायचे. अतिशय शान्त चर्या, स्वच्छ पांढुरके कपडे, हातात एक कापडी पिशवी असं सरांच रूप आजही तसं च्या तसं डोळ्यासमोर येतं. सर खूप सावकाश बोलायचे. बोलण्याला एक संथ अशी लय असायची. काव्याचे गुणधर्म सांगताना एकदा ते म्हणाले होते, "स्मरणसुलभता, श्रवणसुभगता हे काव्याचे विशेष असतात". शब्दांच्या अश्या सुंदर रचना ते सहज बोलून जात. उच्चारांचा पडखरपणा वाखाणण्याजोगा होता. "या संदर्भात तुम्ही श्री. के. क्षीरसागर यांचा एक चांगला निबंध आहे तो वाचा", असं ते जाता जाता सांगत. श्री आणि क्षी दोन्ही उच्चार स्पष्ट दीर्घ. विचार उच्चारांहून स्पष्ट असायचे. ज्ञानेश्वरी वर छान बोलायचे. सर कधीच गडबडीने कुठे जायचे- यायचे नाहीत. तरी प्रत्येक हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळी ते हमखास असायचे.
वाङ्मय मंडळाच्या नावाखाली टिवल्या-बावल्या करणारी आम्ही मंडळी तास न तास लाब्ररीबाहेर गप्पा मारत उभे रहायचो. जाता-येता कधी सर भेटले तर दोन शब्द बोलायचे नि म्हणायचे "चालू द्या तुमच"' जणू ते रसरसून जगणार्‍या आम्हाला सांगायचे तुमचं प्रवाहाबरोबर वाहणं चालू द्या, मी माझ्या शांततेत जातो.
आम्हाला जेव्हा कळलं की अश्या मऊ-मुलायम माणसाच्या प्रबंधाचा विषय होता 'तेंडूलकरांची नाटकं'. तेव्हा खूप खूप आश्चर्य वाटलं होतं. आता कळतं त्यात विसंगत काहीच नव्हतं. तेंडूलकर नावाच्या वादळाचा साकल्याने वेध घ्यायचा असेल तर हवी असणारी धीरोदात्त वॄती, लख्ख समज त्यांच्याजवळ होती.
कॉलेजशी त्यांचं अनेक वर्षांच गूढ आणि गाढ असं नात होतं. शिकण्यापासून शिकवण्यापर्यन्तचा त्यांचा प्रवास त्यांनी या वास्तूच्या उजेडात केला होता. त्यामुळे कॉलेज सोडताना त्यांना वेगळीच अनुभूती येत असावी. त्याकाळात ते निवॄत्ती बद्दल वारंवार बोलत. निवॄत्त होण्यापूर्वीच ते निवॄत्ती झाले होते. हे त्यांचेच शब्द.
दोन वर्षांपूर्वी सर एका कार्यक्रमात भेटले होते. बर्‍याच वर्षांनंतर सरांना पाहिलं, ओळखायला क्षण दोन क्षण लागले. त्यानी नेहमीप्रमाणे अगदी जिव्हाळ्याने विचारपूस केली. जणू मधली काही वर्ष गेलीच नाहीत. कार्यक्रम होता नेमाड्यांच्या मुलाखतीचा. कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पा चालू असताना नेमाड्यांनी सरांना हाक मारली. आणि कळलं की सर नेमाड्यांचे कॉलेजमधले दोस्त आहेत. विश्वासच बसेना. पण मी त्या दोघानां गप्पा मारताना प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहीलं आहे!
आज इतक्यावर्षांनंतरही, रोजचा दिवस तुफान घेऊन येताना दिसतो. स्थित्यंतरांचा आणि संक्रमणांचा काळ अजूनही संपला नाहीये.
सरांसारखं निवान्त गलबत होऊन जगणं कधी जमेल मला?

बोडण

माझ्या आई कडे बोडण झालं. बोडण म्हणजे काय? हे माहित नसणार्‍यांसाठी.....
बोडण हा कुलाचार आहे. ती देवीशी संबंधित अशी एक पूजा आहे. तिचा उल्लेख 'बोडण भरणे' असा करतात. काही जणांत देवीचा गोंधळ घालतात तसेच हे.
बोडण दोन प्रकारचे असते नित्य म्हणजे दरवर्षी करावयाचे आणि नैमित्तिक म्हणजे घरात एखादं मंगलकार्य झाल्यावर, बाळाचा जन्म झाल्यावर करावयाचे. आमच्याकडचे बोडण नैमित्तिक स्वरूपाचे होते.
बोडणचा विधी थोडक्यात असा: ह्या पूजेसाठी चार सवष्णी (पैकी घरची एक व इतर तिघी) आणि एक कुमरिका अश्या एकूण पाचजणी बसतात. एका निकल्ह्या (कधीच कल्हई न केलेली) परातीत आधी सुपारीच्या गणेशाची पूजा करतात. मग घरच्या अन्नपूर्णेची प्रतिष्टापना करतात. तिच्यासाठी कणकेचे आसन व इतर अलंकार बनवतात. एक घडा बनवून त्यात दूध ठेवतात. मग देवीची पंचाम्रती पूजा करतात. पुरणा-वरणाच्या स्वयंपाकाचे पाच नैवेद्य देवीला दाखवतात. कणकीच्या दिव्यांनी देवीची आरती करतात. मग हे दिवे पण परातीत ठेवतात. त्यावर दूध घालून ते निववतात.
या पूजेत कुमारिकेला देवी मानतात व तिला काय हवे नको ते विचारतात. दूध, दही, तूप, साखर आणि मध यापैकी ती जे आणि जेवढं मागेल तेवढ त्या परातीत ओततात. मग पाचही जणी मिळून ते बोडण कालवतात. कुमारिकेला 'धायलीस का?' अस विचारतात ती जर हो म्हणाली तर कालवणं थांबवतात. मग ते कालवलेले अन्न गायीला वाढतात.
सर्व सवाष्णी, कुमारिकांना पुरणाचे जेवण देतात. नंतर त्यांची खणा-नारळाने ओटी भरतात.
असा हा विधी असतो. हे त्याचे काही फोटो:
देवी साठी बनविलेले आसन व अलंकार :

गणपतीची पूजा:
देवीची पूजा
आरती
कुमारिका
कालवण्यापूर्वी
कालवल्यानंतर