Friday, February 20, 2009

बोडण

माझ्या आई कडे बोडण झालं. बोडण म्हणजे काय? हे माहित नसणार्‍यांसाठी.....
बोडण हा कुलाचार आहे. ती देवीशी संबंधित अशी एक पूजा आहे. तिचा उल्लेख 'बोडण भरणे' असा करतात. काही जणांत देवीचा गोंधळ घालतात तसेच हे.
बोडण दोन प्रकारचे असते नित्य म्हणजे दरवर्षी करावयाचे आणि नैमित्तिक म्हणजे घरात एखादं मंगलकार्य झाल्यावर, बाळाचा जन्म झाल्यावर करावयाचे. आमच्याकडचे बोडण नैमित्तिक स्वरूपाचे होते.
बोडणचा विधी थोडक्यात असा: ह्या पूजेसाठी चार सवष्णी (पैकी घरची एक व इतर तिघी) आणि एक कुमरिका अश्या एकूण पाचजणी बसतात. एका निकल्ह्या (कधीच कल्हई न केलेली) परातीत आधी सुपारीच्या गणेशाची पूजा करतात. मग घरच्या अन्नपूर्णेची प्रतिष्टापना करतात. तिच्यासाठी कणकेचे आसन व इतर अलंकार बनवतात. एक घडा बनवून त्यात दूध ठेवतात. मग देवीची पंचाम्रती पूजा करतात. पुरणा-वरणाच्या स्वयंपाकाचे पाच नैवेद्य देवीला दाखवतात. कणकीच्या दिव्यांनी देवीची आरती करतात. मग हे दिवे पण परातीत ठेवतात. त्यावर दूध घालून ते निववतात.
या पूजेत कुमारिकेला देवी मानतात व तिला काय हवे नको ते विचारतात. दूध, दही, तूप, साखर आणि मध यापैकी ती जे आणि जेवढं मागेल तेवढ त्या परातीत ओततात. मग पाचही जणी मिळून ते बोडण कालवतात. कुमारिकेला 'धायलीस का?' अस विचारतात ती जर हो म्हणाली तर कालवणं थांबवतात. मग ते कालवलेले अन्न गायीला वाढतात.
सर्व सवाष्णी, कुमारिकांना पुरणाचे जेवण देतात. नंतर त्यांची खणा-नारळाने ओटी भरतात.
असा हा विधी असतो. हे त्याचे काही फोटो:
देवी साठी बनविलेले आसन व अलंकार :

गणपतीची पूजा:
देवीची पूजा
आरती
कुमारिका
कालवण्यापूर्वी
कालवल्यानंतर