Thursday, February 14, 2008

खजूर पोळी

साहित्य:

१२-१४ बिया काढलेले खजूर
पाव वाटी दूध
२ चमचे तांदूळ पिठी
२ चमचे पिठी साखर
१ छोटी वाटी कणिक
२ चमचे तेल
थोडं साजूक तूप
प्रथम खजूराचे बारीक तुकडे करून घ्या. ते कढत दूधात तासभर भिजत घाला. तोवर २ चमचे तेलाच मोहन घालून जरा सैलसर कणिक भिजवून घ्या. मग भिजलेला खजूर मिक्सरवर छान बारीक करून घ्या. मग एका कढईत २ चमचे साजूक तूप गरम करून त्यात वाटलेला खजूर टाका. मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परता. गॅस बंद करा. पिठी साखर आणि तांदूळ पिठी टाकून छान एकजीव करून घ्या. ही झाली पूर्वतयारी.
आता कणकेची पारी करून त्यात खजूराचे सारण भरा. तयार उंडा हलक्या हाताने लाटा. मंद आचेवर तूप सोडून भाजून घ्या. झाली तयार खजूर पोळी.

No comments: